-->

Advertisement

(Kokan Railway) कोकण रेल्वे भरती २०२० - Kokan Railway Recruitment 2020

(Kokan Railway) कोकण रेल्वे भरती २०२० - Kokan Railway Recruitment 2020कोकण रेल्वे (Kokan Railway Corporation Limited (KRCL)) ने टेक्निशियन आणि इलेक्ट्रिकल्स च्या उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती अंतर्गत एकूण 58 उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. या पदासाठी दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतील. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ नोव्हेंबर २०२० आहे. या भरतीमध्ये टेक्निशियन - III/इलेक्ट्रिकल पदासाठी अर्ज मागवले आहेत. दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण उद्योगासाठ ही एक चांगली संधी आहे. या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

एकुण जागा :- ५८

पदाचे नाव :-

टेक्निशियन - III/इलेक्ट्रिकल या पदासाठी अर्ज मागवले आहेत.

शैक्षणिक पात्रता :-

उमेदवारांनी जाहिरात मध्ये दिल्याप्रमाणे शैक्षणिक/तांत्रिक पात्रता असणे आवश्यक आहे. जे उमेदवार अंतिम निकालाच्या प्रतीक्षेत आहेत ते उमेदवारांना या पदासाठी अर्ज करू शकणार नाहीत. अर्ज करणारे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय इलेक्ट्रिशियन/वायरमन/मेकॅनिक विभागातून मान्यताप्राप्त संस्थेमधून उत्तीर्ण झालेली असावी.

वयाची अट:- 

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वय किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 33 वर्षे निश्चित केले गेले आहे. ०१ जानेवारी २०२१ पर्यंत व ग्राह्य धरले जाईल.SC/ST च्या उमेदवारांना ५ वर्षे सूट आणि OBC उमेदवारांना ३ वर्ष सुट्टी देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण :-

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना नोकरीच्या ठिकाणी हे कोकण रेल्वे कार्यक्षेत्र देण्यात येईल.

आवेदन शुल्क :- 

या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ₹ ५०० शुल्क भरावे लागेल. SC/ST/ExSM/EBC/अल्पसंख्यांक/महिला यांना ₹ २५० शुल्क भरावे लागेल.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:-


या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना २७ नोव्हेबर २०२० ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २७ नोव्हेबर २०२० रोजी किंवा त्याआधी अर्ज करावे.

या पदासाठी असे करा अर्ज :- 


  1. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अगोदर  एकदा KRCL ची अधिकृत वेबसाईट www.kokanrailway.com 
  2. भेट देऊन जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  3. उमेदवारांनी पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण केले आहेत याची खात्री करून घ्यावी 
  4. उमेदवारांनी KRCL च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्यांची नावे नोंदवावी. नाव नंतर उमेदवारांना रजिस्ट्रेशन नंबर दिले जाईल आणि त्यांना ई-मेल द्वारे पासवर्ड पाठवली जाईल.
  5. उमेदवारांनी अर्ज करतांना आपली माहिती काळजीपूर्वक अचूकपणे भरून घ्यावी.
  6. शेवटच्या क्षणाची होणारी गर्दी टाळण्यासाठी मजूर आहे त्यांच्या स्वतःच्या आवडीनुसार लवकरात लवकर सब्मिट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.शेवटच्या दिवशी जबरदस्तीने लोड झाल्याने वेबसाइटवर लॉग इन करण्याची क्षमता अपेशी होण्याची शक्यता असते त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरावे.

भरती प्रक्रिया :-

उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर सर्व अर्जांची छाननी केल्यानंतर निवड केलेल्या उमेदवारांची अधिकृत वेबसाईटवर नावे जाहीर केले जातील.निवड केलेल्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेतली जाईल. या पदासाठी लेखी परीक्षा ही डिसेंबर २०२० मध्ये होण्याची शक्यता आहे.

अभ्यासक्रम :-

या पदासाठी अर्ज करावा उमेदवारांचे ९० मिनिटांची 100 प्रश्नांची लेखी परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेमध्ये जनरल अवरेनेस (General Awareness)& टेक्निकल (Technical) या अभ्यासक्रमाच्या आधारावर प्रश्न विचारले जातील.

  • अधिकृत वेबसाईट :-Click Here