Join us On Social Media

Join our Telegram Channel To Get Latest Notification!
Join our YouTube Channel To Get Latest Video Notification!
Follow Me On Facebook To Get Latest Notification!
Techy Pranav PKD ART

(PCMC) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत 'समूह संघटक' पदाची भरती - PCMC Recruitment 2020

(PCMC) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत 'समूह संघटक' पदाची भरती -

 PCMC Recruitment 2020


पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात महानगरपालिकेच्या नगर्वस्ती विकास योजना विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबवल जातात. सदर योजनांचा वस्ती पातळीवर प्रचार व प्रसार करणे, तसेच योजना संदर्भातील इतर सर्व कामकाजा करिता 'समूह संघटक' या अभीनामाची 20 पदे सहा महिने कालावधी करता तात्पुरत्या स्वरूपात मानधनावर भरावयाची आहेत. त्याकरता आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या नुसार अर्ज मागवले आहेत. अर्ज पोचवण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2020 आहे.

जाहिरात क्रमांक:- 01/2020, नावियो/कावि/561/2020

Total :- 20 जागा

पदाचे नाव :- समुह संघटक

शैक्षणिक पात्रता 

समूह संघटक पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी 
१) पदवीधर
२) MSW
३) MS Office/ MS-CIT
उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.


वयाची मर्यादा 


या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 18 आणि जास्तीत जास्त वय 38 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तसेच मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षे सूट देण्यात आली आहे.शारीरिक दृष्ट्या सक्षम असणारे व यापूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरवस्ती विकास योजना विभागाकडे कामकाजाचा अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी वर्षे 50 इतकी देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण :-


निवडणूक झाल्यावर उमेदवार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या परिसरात नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात काम करणे बंधनकारक आहे.

PCMC समूह संघटक उमेदवारांच्या भरतीसाठी असे करा अर्ज


या पदासाठी इच्छुक असणारे उमेदवार ६ नोव्हेंबर २०२० पर्यंत www.pcmcindia.gov.in या संकेत स्थळावरील नोकरीविषयक या सत्रामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला अर्जाचा नमुना पाहून इच्छुक उमेदवारांनी अर्ज व प्राधान्य क्रमांकाचा नमुना डाऊनलोड करून घेऊन सदर विहीत नमुन्यातील अर्ज स्वच्छ अक्षरात भरून स्वतःच्या नावाने काढलेला पासपोर्ट साईजचा फोटो, आधार कार्ड, वयाचा पुरावा, शैक्षणिक अहर्ता, जातीचे प्रमाणपत्र पुरावा, कागदपत्राच्या सत्य प्रती कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत होतील अशा पद्धतीने पाठवावेत.

फी :- 

या पदासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

परीक्षा नमुना 


पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून उमेदवारांची पात्रता यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. पात्र झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षा बहुपर्यायी एकूण १०० गुणांची असून प्रत्येक प्रश्नाला २ गुण याप्रमाणे पन्नास प्रश्नांची घेण्यात येईल.


अभ्यासक्रम :-


लेखी परीक्षेसाठी MSW विषयाचा अभ्यासक्रम, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, वस्ती पातळीवरील कामकाजाचे ज्ञान या बाबीवर घेण्यात येईल.


लेखी परीक्षेचे वेळापत्रक :-


लेखी परीक्षेचे वेळापत्रक व स्थळ मनपाचे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल व उमेदवाराने अर्जात नमूद केलेल्या मोबाईलवर एसएमएस द्वारे कळविण्यात येईल.


लेखी परीक्षेचा निकाल


लेखी परीक्षेनंतर सदर पदांची निवड यादी व प्रतिक्षा यादी महापालिके संघर्षानंतर प्रसिद्ध करण्यात यावे सदर प्रतीक्षायादी कालावधी ६ महिने राहील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता


पिंपरी चिंचवड महानगरपालिका  नागरवस्ती विकास योजना विभाग, मुंबई-पुणे रस्ता, पिंपरी ४११०१८


अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 

०६ नोव्हेंबर २०२०

अधिकृत वेबसाईट :- Click Here

जाहिरात (Notifications) & अर्ज (Application Form) :- Click Here