इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिस पदाच्या 482 जागांसाठी भरती - IOCL Apprentice Recruitment -2020इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये अप्रेंटिस च्या पदासाठी भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये एकूण 482 जागा भरावयाच्या आहेत. या भरतीमध्ये टेक्निशियन अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस या पदासाठी अर्ज मागवले आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2020 आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचे आहे. ह्या पदाच्या निवडीसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल ही लेखी परीक्षा अंदाजे 6 डिसेंबर 2020 रोजी घेण्यात येईल.
 
जाहिरात क्रमांक :- PL/HR/ESTB/APPR-2020

एकुण जागा :- 482 जागा

शैक्षणिक पात्रता :-

मेकॅनिकल :- या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असावे.

इले्ट्रिकल :- या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार इलेक्ट्रिकल किंवा इले्ट्रीकल & इले्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असावे.

टेलिकम्युनिकेशन & इन्स्ट्रूमेंटेमेशन :- या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असावे.

हुमन रिसोर्स (HR) :- या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठ कोणत्याही शाखेतून पदवीधर उत्तीर्ण असावे.

अकाउंटंट :-या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठ पदवीधर (B.com) उत्तीर्ण असावे.
डाटा एंट्री ऑपरेटर :- या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार बारावी उत्तीर्ण असावे.

वयाची अट :-

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 24 वर्षे निश्चित केली आहे. उमेदवारचे वय 30.10.2020 पर्यंत ग्राह्य धरली जाईल. SC/ST च्या उमेदवारांना 5 वर्षे सूट तर OBC उमेदवारांना 3 वर्षे सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण :- 

या पदासाठी निवड झालेल्या उमेदारांना संपुर्ण भारतात कोणतेही ठिकाण दिले जाईल.

आवेदन शुल्क :-

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेवारांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अप्रेंटीशीप ट्रेनिंग चा कालावधी:-

टेक्निशियन अप्रेंटिस (Elec/Mech/T&I) :- 1 वर्षे
ट्रेड अप्रेंटिस ( Assistant HR / Accountant ) :- 1 वर्षे
डाटा एंट्री ऑपरेटर :- 15 महीन

या पदासाठी अशी केली जाईल निवड.

  • निवड पद्धत लेखी परीक्षा द्वारे केली जाईल.
  • लेखी परीक्षा ही बहुपर्यायी प्रश्न त्यात चार पर्याय असतील त्यातील एक बरोबर असेल. उमेदवारांना बरोबर पर्याय उत्तर द्यायचा आहे.
  • एक्सप्रेशन मध्ये एकूण 100 प्रश्न असतील त्यातील 100 प्रश्नांना 100 गुण असतील. प्रत्येकी एक बरोबर उत्तराला एक गुण मिळेल.
  • ह्या परीक्षा मध्ये निगेटिव्ह मार्किंग पद्धत नाही.
  • लेखी परीक्षा ही 120 मिनिटाची म्हणजे 2 तासाची घेतली जाईल.
  • उमेदवारांना परीक्षाही इंग्रजी अथवा हिंदी भाषेत द्यावी लागेल.

या पदासाठी असे करा अर्ज.

उमेदवार IOCL च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन एकदा जाहिरात पूर्णपणे वाचून घ्यावी त्यानंतर Apply Online Form वर क्लिक करून आपले फॉर्म अचूक प्रमाणे भरून घ्यावे. ऑनलाइन फॉर्म 04.11.2020 पासून 22.11.2020 पर्यंत भरवल जाईल.

  • अधिकृत वेबसाईट :-Click Here