मृदा (भूगोल) - Soil Geography Notes
राज्यसेवा पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षेला मृदा हा महत्त्वाचा घटक आहे या अंतर्गत मृदेची निर्मितीची प्रक्रिया मृदेमध्ये आढळणारी खनिजे व पोषणमूल्य जमिनीची होणारी धूप होण्याचे प्रकार महाराष्ट्र त्याचे वितरण व मृदा संवर्धनाचे उपाय या घटकांचा समावेश होतो.
१. पर्वतीय मृदा :
- निर्मिती :- उत्तर व ईशान्य भारतातील डोंगराळ भागातील पर्वत उतारावर खडक झिजून मृदा बनते. ती जाडीभरडी असते.
- क्षेत्र : या मृदेने देशातील ८ % क्षेत्र व्यापले आहे.
- रासायनिक पुथ्थकरण : यातील जाड्याभरड्या खतांच्या तुकड्यांमध्ये या मृदेत पाणी टिकत नाही म्हणून तिला अपरिपक्व मृदा असे म्हणतात.
- पिके : डोंगर उतारावर सापडणारा या मृदेत चहाचे मळे फुलतात.
- प्रदेश / राज्य :- जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश.
२. गाळाची मृदा:-
- क्षेत्र :- श्याम मृदेने देशातील २२ टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.
- रासायनिक पुथ्थकरण :- यामध्ये वाळू, चिकणमाती व सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण अधिक असते. पालाश व चुना यांचे प्रमाण अधिक असते.
- पिके :- ही मृदा अत्यंत सुपीक असून गहू, हरभरा, तांदूळ, कापूस, तंबाखू इत्यादी पिकांसाठी योग्य आहे.
- प्रदेश :- फिकट पिवळ्या व करड्या रंगाची ही मृदा नदी खोरे व नदी किनारी मैदानी प्रदेशात आढळते.उत्तर महाराष्ट्रातील तापी-पूर्णा खोरे, गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा नदी खोरे, नर्मदा, गोदावरी नदी खोरे, पंजाब, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल.
३ वालुकामय मृदा :-
- क्षेत्र :- या मृदेने देशातील ६ टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. रासायनिक पुथ्थकरण :- यात क्षारांचे प्रमाण सर्वाधिक तर सेंद्रिय कमी असते.
- पिके :- पाण्याचे उपलब्धतेनुसार यात कापूस, हरभरा, ज्वारी, मका, बाजरी ही पिके घेतली जातात.
- प्रदेश:- मध्य व पश्चिम राजस्थानचा वाळवंटी प्रदेश.
४. रेगूर / काळी मृदा / ब्लॅक कॉटन सॉईल :-
- क्षेत्र:- या मृदेने देशातील २९ टक्के क्षेत्र असलेला आहे.
- निर्मिती:- दख्खन पठारावर प्रामुख्याने आढळणारे ही काळी कसदार मृदा बेसाल च्या विभाजना पासून बनते
- रासायनिक पृथक्करण:- या मृदेत चुनखडी, पोट्याश, लोह त्यांचे अधिक्य तर नायट्रोजन, फॉस्फरस व सेंद्रिय द्रव्ये कमी प्रमाणात असतात. चिकणमातीचे प्रमाण अधिक असलेल्या अधिक पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेल्या या मृदेत कापसाचे पीक चांगले येते म्हणून तिला कापसाची काळी मृदा म्हणतात.
- काळा रंग :- टिटॅनिफेरस मॅग्नेटाईट ह्या द्रव्यामुळे च्या प्रदेश काळा रंग प्राप्त होतो.
- प्रदेश:- महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश.
५. तांबडी पिवळसर मृदा :-
- क्षेत्र:- या मृदेने देशातील २७ टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.
- निर्मिती:- विंध्यन, कडप्पा, व आकियन काळातील ग्रॅनाईट खडकाची, नीच खडकांच्या अपक्षयाने.
- तांबडा रंग:- लोह संयोगाचे प्रमाण अधिक असल्याने या प्रदेश तांबडा रंग प्राप्त होतो.
- पिके:- तांदूळ, कापूस, भुईमूग.
- प्रदेश:- तमिळनाडू, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश पूर्व भाग, ओडिसा, छत्तीसगढ, छोटा नागपूर पठार, महाराष्ट्र नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
६. जांभी मृदा :-
- क्षेत्र:- या मृदेने देशातील ३ टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.
- लाल रंग:- लोह, जस्त व ॲल्युमिनियमचे प्रमाण अधिक असल्याने.
- रासायनिक पृथक्करण:- यात चुना व सिलिकाचे प्रमाण अधिक असते
- पिके:- शेतीच्या दृष्टीने निरुपयोगी अशा मृदेत काजू, कॉफी, रबर यांची लागवड केली जाते.
- प्रदेश:- २००० मिमी पेक्षा जास्त पावसाच्या प्रदेशात जांभी मृदा आढळते दक्षिण महाराष्ट्र, कोकण, गोवा, कर्नाटक, केरळ राज्याच्या डोंगराळ भागात आढळते.
७. दलदलीच्या मृदा :-
- निर्मिती:- समुद्रकिनाऱ्याजवळील सतत पाण्याच्या संपर्काततील प्रदेशात या मृदेची निर्मिती होते.
- रासायनिक पृथक्करण:- लोहाचे व सेंद्रिय घटकांचे प्रमाण या मृदेत अधिक असते.
- पिके:- ताग हे या मृदेतील प्रमुख पीक आहे.
- प्रदेश:- पश्चिम बंगालमधील सुंदर्बन, उत्तर प्रदेशातील तराई, ओडिशा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू.
८ क्षारयुक्त व अल्कली मृदा:-
- क्षेत्र:- या मृदेने देशातील ३ टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. रासायनीक पृथक्करण:- ही मृदा त्यातील क्षार व अल्लकलीच्या प्रमाणामुळे नापीक आहे.
- प्रदेश:- पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशाचा, पश्चिम भाग.