-->

Advertisement

महाराष्ट्राचा भूगोल (Geography Of Maharashtra In Marathi)

महाराष्ट्राचा भूगोल ( Maharashtra Bhugol)महाराष्ट्र हा राज्य भारताच्या पश्चिम भागातील सर्वात मोठा राज्य म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र राज्याची स्थापना ही 1 मे 1960 रोजी झाली होती परंतु त्याआधी द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना ही 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली होती. ह्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची निवड केली गेली होती. महाराष्ट्राची स्थापना ही द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाल्यानंतर झाली होती.महाराष्ट्र राज्य हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांक क्रमांक वर येतो. मध्यप्रदेश हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा राजा आहे त्यापाठोपाठ महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौ. किमी. इतके आहे.मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून याला भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते. मुंबई हे शहर सर्वात मोठे औद्योगिक असलेले शहर म्हणून मानले जाते. भारतातील सर्वात जास्त आर्थिक उलाढाल ही मुंबईमध्ये होते. महाराष्ट्र राज्यात मराठी ही भाषा सर्वात जास्त वापरली जाते. महाराष्ट्र राज्याची स्थापना ही मराठी भाषकांसाठी केली होती. 

महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर राज्याचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण होते. महाराष्ट्र राज्यात पंचायत राजची सुरुवात ही 1 मे 1962 रोजी सुरुवात झाली. महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश होते. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर विधानसभेचे पहिले सभापती म्हणून ग.वा. माळवणकर यांची निवड केली गेली होती.

महाराष्ट्र राज्याची वैशिष्ट्ये :-

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते आणि महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून नागपूरला ओळखले जाते.कोल्हापूर हे महाराष्ट्राचे ऐतिहासिक राजधानी तर पुणे हे सांस्कृतिक राजधानी आणि औरंगाबादला पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र या राज्याचे राज्य प्राणी शेकरू, राज्य फुलपाखरू ब्लू मॉरमॉन, राज्य पक्षी हरावत, राज्य खेळ कबड्डी, राज्य वृक्ष आंबा, राज्य फुल तामण, राज्य फळ आंबा असे ओळखले जाते.


महाराष्ट्र राज्याला लागणारा समुद्रकिनारा:-

महाराष्ट्र राज्य हा भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने 9.42% इतका आहे. महाराष्ट्राला आरती समुद्र चा समुद्र किनारा लागतो हा किनारा एकूण 720 किमी. आहे. महाराष्ट्रात 800 किमी. ता समुद्र किनारा हा पूर्व पश्चिमेस लागतो तर दक्षिण उत्तर चे अंतर हे 700 किमी. आहे.

महाराष्ट्र ला लागून असणारे राज्य:- 

महाराष्ट्राला एकूण 7 राज्याची सीमा लागते. यामध्ये पूर्वेस व ईशाने छत्तीसगड, उत्तरेस मध्य प्रदेश, दक्षिणेस कर्नाटक व गोवा, आग्नेयेस तेलंगणा, पश्चिमेस अरबी समुद्र, वायव्येस गुजरात दीव दमण दादरा नगर हवेली यांची सीमा लागते.

महाराष्ट्र राज्याची प्राकृतिक रचना:-

महाराष्ट्र राज्य हे एकूण तीन विभागात विभागली गेली आहे त्यामध्ये कोकण सह्याद्री/पश्चिम घाट दख्खन पठार अशा भागांमध्ये विभागली गेली आहे. महाराष्ट्रात एकूण सात प्रादेशिक विभाग आहेत त्यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश, विदर्भ, अशा मध्ये विभागणी केली आहे. 

महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या (Population Of Maharashtra) :-

महाराष्ट्र हा लोकसंख्येच्या दृष्टिकोनाने दुसरे सर्वात जास्त लोक संख्या असलेले राज्य म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात 2001 च्या जनगणनेनुसार 9,68,78,627 इतकी लोकसंख्या होती आणि भारताच्या लोकसंख्येची 9.42% इतके प्रमाण होते. तर 2011 च्या जनगणनेनुसार 11,23,71,9720इतकी लोकसंख्या होती आणि भारताच्या लोकसंख्येचे 9.28% प्रमाण होते. महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त लोकसंख्या ही पुणे शहरात आहे.