उत्पन्न दाखला - उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे - Income Certificate Online Maharashtra 2022
उत्पन्न दाखला - Income Certificate
उत्पन्नाचा दाखला अर्ज PDF
उत्पन्नाचा दाखला कसा काढावा 2022 - 2023?
उत्पन्नाचा दाखला शासकीय योजना साठी, महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी, आणि विशिष्ट जाती समूहाला शिष्यवृत्ती योजनेसाठी महत्त्वाचे असते. जर नागरिक उत्पन्न दाखला मिळण्यासाठी बरोबर आणि योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्यास खूप कमी दिवसात उत्पन्न दाखला मिळू शकतो. उत्पन्नाचा दाखला अर्ज केल्यापासून 15 दिवसाच्या आत मिळाले पाहिजे. कुठला दाखला हा नायब तहसीलदार किंवा तहसीलदार यांच्याकडून देखील मिळू शकते.
उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे 2022:-
उत्पन्नाचा पुरावा :-
- आयकर विवरण पत्र
- वेतन मिळत असल्यास फॉर्म नंबर 16
- निवृत्तीवेतनधारकांना साठी बँकेचे प्रमाणपत्र
- नवीन मालक आपल्या ७/१२ आणि ८अ चा उतारा व तलाठी अहवाल जोडावे.
रहिवासी दाखला
ओळखीचा पुरावा (कोणतेही एक) :-
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- ड्रायव्हिंग लायसन्स
- पासपोर्ट
पत्त्याचा पुरावा (कोणतेही एक) :-
- रेशन कार्ड
- लाईट बिल
- कर पावती
- ७/१२ किंवा ८अ उतारा
- फोन बिल पाणीपट्टी घरपट्टी.
उत्पन्न दाखला साठी अर्ज कुठे करावा 2022?
उत्पन्नाचा दाखला अर्ज कसा भरावा 2022?
उत्पन्न दाखला मिळण्यासाठी सर्व संबंधित कागदपत्रे घेऊन आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू कार्यालय या ठिकाणी जाऊन अर्ज करावे. किंवा जवळच्या महा ई सेवा केंद्र येथे जाऊन ऑनलाइन उत्पन्न दाखला मिळू शकतात.