संजय गांधी निराधार अनुदान योजना महाराष्ट्र 2022
Sanjay Gandhi Niradhar Yojana Information In Marathi 2022 Maharashtra
संजय गांधी निराधार योजनेची माहिती
केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने अनेक योजना चालवण्यात येत आहेत त्यात संजय गांधी निराधार योजना ही आहे.
राज्य शासनाच्या वतीने राज्यातील निराधार, वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसाय पासून मुक्त केलेल्या महिला, घटस्फोटित महिलांना अर्थसहाय्य देण्याच्या हेतूने संजय गांधी निराधार अनुदान योजना 1980 पासून राबविण्यात येत आहे.
Read:- Sarkari Yojana
संजय गांधी निराधार योजना पात्रता, अटी व शर्ती
- संजय गांधी निराधार योजना साठी निराधार, वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, घटस्फोटीत महिला, अनाथ मुले तृतीयपंथी असणारे या योजनेसाठी पात्र असतील.
- अर्ज करणाऱ्या व्यक्ती किंमत पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 65 वर्षांपेक्षा कमी असावे.
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे कुटुंबाचे उत्पन्न प्रतिवर्षी रुपये 21,000 पर्यंत असावे.
संजय गांधी निराधार योजना लाभाचे स्वरूप
- पात्र असलेल्या व्यक्तीस दरमहा 600 रुपये देण्यात येते.
- एका कुटुंबात एका पेक्षा अधिक लाभार्थी असल्यास कुटुंबाला 900 प्रतिमा अनुदान देण्यात येते.
संजय गांधी निराधार अनुदान योजना साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे 2022
- वयाचा दाखला
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- अपंगत्व रोगग्रस्त बाबत जिल्हा शल्यचिकित्सक / सरकारी हॉस्पिटलच्या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिका-यांच्या दाखला
संजय गांधी निराधार अनुदान योजना अर्ज कोठे व कसा करावा 2022?
- अर्जदार राहत असलेल्या भागातील संबंधित तलाठी /तहसीलदार येथे संपर्क साधावा.