वाक्य व वाक्यांचे प्रकार _ Vakyache Prakar (Types of Sentences) In Marathi PDF Download
Vakya Prakar in Marathi
वाक्य व त्याचे प्रकार
वाक्य म्हणजे काय?
आपल्या बोलण्यातून अनेक वाक्य एकामागून एक येत असतात. त्यातले प्रत्येक वाक्य हे एक संपूर्ण विधान असते. प्रत्येक वाक्यात आपण कोणाबद्दल काहीतरी बोलतो म्हणजे विधान करतो. बोलणारा त्याच्याशिवाय बोलतो त्याला उद्देश असे म्हणतात व उद्देशा विषयी तो जे बोलतो त्याला विधेय असे म्हणतात. प्रत्येक वाक्यात उद्देश व विधेय या दोन्ही गोष्टी असतात.
पुढील वाक्य पाहा
- त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेट सामन्यात चांगला खेळला.
हे वाक्य आहे यात कोणते विधान केले आहे? खेळ आहे विदा कोणाला उद्देशून केले आहे? मुलगा यांच्या बद्दल म्हणजे या वाक्यात मुलगा उद्देश व खेळला आहे विधेय. पण या वाक्यात एवढे दोन शब्द नाहीत. त्याचा धाकटा या दोन शब्दांनी उद्देश विस्तार केला आहे. आज क्रिकेटच्या सामना चांगला या शब्दांनी तो केव्हा कोठे व कसा खेळला हे सांगितले आहे. विधेया चा विस्तार याच्या शब्दाने केलेला आहे. याचा अर्थ असा की वाक्यात उद्देश व विधेय एवढेच शब्द न येता त्यांचा विस्तार करणारे शब्दही येतात म्हणून वाक्याचे दोन भाग पडतात. १) उद्देश्य विभाग २) विधेय विभाग.
वाक्यांचे प्रकार
वाक्यांचे त्यांचे अर्थ अनुरोधाने विविध प्रकार होतात ते पुढील प्रमाणे
- ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात
उदाहरणार्थ :- माझे वडिल आज परगावी गेले.
- ज्या वाक्यात प्रश्न विचारला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य म्हणतात.
उदाहरणार्थ:- तू पुणेला केव्हा जाणार आहेस?
- ज्या वाक्यात भावनेचा उत्कर काढलेला असतो त्याचा उद्गारार्थी वाक्य म्हणतात.
उदाहरणार्थ:- अबब! एवढी प्रचंड आगी!
- वाक्यातील विधाने ही कधीकधी होकारार्थी असतात. जसे गोविंदा अभ्यास करतो. पण कधीकधी विधानात नकार असतो. तसे त्याचा मुलगा मुळीच अभ्यास करत नाही. अशा वाक्यांना नकारार्थी वाक्य म्हणतात.