-->

Get Job Alert On Telegram

Join our Telegram Channel To Get Latest Notification!
Join our YouTube Channel To Get Latest Video Notification!

Welcome to MahaGovJobs

क्रियापद व त्याचे प्रकार - Kriyapad in Marathi - Verb and its Types

Kriyapad in Marathi Examples

क्रियापद म्हणजे काय

क्रियापद हा वाक्यातील मुख्य शब्द होय. क्रियापदाचे खेरीज वाक्याचा अर्थ सहसा पूर्ण होत नाही, म्हणून प्रत्येक वाक्यात क्रियापद हे असावीच लागते. काही म्हणीवजा वाक्यात तो शब्द गाळला असतो किंवा गुप्त असतो. वाक्यात  क्रियापदने दाखवलेली क्रिया करणारा जो कोणी असतो त्यास करता असे म्हणतात. करता म्हणजे क्रिया करणारा.

क्रियापदाचे प्रकार

क्रियापदाचे मुख्य प्रकार दोन आहेत :- 

  • सकर्मक क्रियापद
  • अकर्मक क्रियापद

सकर्मक क्रियापद.

पुढील वाक्य पहा.

()गवळे धार काढतो.

()अनुराग निबंध लिहतो.

()आरोही लाडू खाते.

वरील वाक्यांना पूर्ण अर्थ आहे जर' गवळी काढतो, 'अनुराग लिहतो`, 'आरोही खाते`, एवढेच वाक्य दिलीतर त्यांचे अर्थपूर्ण होत नाही. म्हणजेच 'काढतो ` या क्रियापदाला धार या कर्माचची जरुरी आहे, म्हणून  'काढतो `हे क्रियापद सकर्मक आहे तसेच ' लिहितो` ' खातोया क्रियापदांच्या बाबतीतही यावरून असे दिसते की , जो क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात.

अकर्मक क्रियापद.

 पुढील वाक्य पहा.

() मी रस्त्यात पडलो

()आज भाऊबीज आहे.

() सुनील उद्या पुण्याला जाईल.

वरील वाक्यातील ' मी रस्त्यात पडलो ` या वाक्यात पडण्याची क्रिया कर्त्यावरच घडते. ती क्रिया कर्त्यापासून पुढे जात नाही. ' मी पडलो ` त्यात पुरा अर्थ आहे .

पडलोया क्रियापदाला कर्माची जरूरी नाहीम्हणून ' पडलो ` हे क्रियापद क्रमक आहे .उरलेल्या त्यांच्या बाबतीत तसेच म्हणता येईल.

यावरून असे दिसते की.

कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्या पाशीच थांबत  असेल किंवा कर्त्याच्या ठिकाणी लय पावते असेल चर्च क्रियापद ' अक्रमक ` असते .