[PDF] मराठी पत्र लेखन - Marathi Letter Writing Format & Examples - Patra Lekhan in Marathi
Marathi Patralekhan 2023 PDF
मराठी पत्र लेखन नमुना
पत्रलेखन
आपल्या मनातील भावना, विचार, मते अभिव्यक्त करायचे माध्यम म्हणजे बोलणे हे आपण सगळे जाणतोच. पण ही अभिव्यक्ती अधिक मुद्देसूदपणे, सुसंबद्ध पद्धतीने अपेक्षित व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे उत्तम माध्यम म्हणजे पत्रलेखन! प्रत्यक्ष बोलताना कधीतरी विषयासंदर्भात एखादा मुद्दा राहून जाण्याची शक्यता असते. परंतु पत्रलेखन करताना ते लिहिण्याआधी वैचारिक पातळीवर आपली पूर्वतयारी होत असते; त्यासाठी वेळ मिळत असतो, आणि त्यामुळेच पत्रलेखन हे अधिक मुद्देसूद, सुसंगत, नेमके, परिणामकारक होत असते. पत्रलेखनाचे प्रामुख्याने औपचारिक (व्यावहारिक) आणि अनौपचारिक (घरगुती, कौटुंबिक इ.) असे प्रकार पडतात.
औपचारिक पत्रे (Formal Letter Writing in Marathi)
(निमंत्रण, आभार, चौकशी तक्रार मागणी, विनंती इ.)
औपचारिक पत्रे ही बहुतेक वेळा आपण काहीशा त्रयस्थ, अपरिचित व्यक्तीला लिहीत असतो. या पत्रातून आपण आपले काम करून घेण्याच्या, काही माहिती मिळवण्याच्या भूमिकेत असतो. त्यामुळे या पत्रांचे लेखन ठरलेल्या संकेतांनुसारच होणे आवश्यक असते.
मागणीपत्राद्वारे आपल्याला आवश्यक उपलब्ध करून देण्याची साहित्य विनंतीच आपण करत असतो. तक्रारपत्रातून आपल्याला होणारा त्रास, अपेक्षा आपण संबंधित व्यक्तीला कळवत असतो आणि तो त्रास दूर व्हावा, आपल्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून विनंतीच करत असतो. चौकशी पत्रातही आपल्याला काही माहिती जाणून घ्यायची असते. ती कळवण्यासाठीची विनंतीच आपण पत्रातून करत असतो. त्यामुळे हे सगळे विनंतीपत्राचेच प्रकार होऊ शकतील. त्यातले भेद खूपच पुसत आहे.
औपचारिक पत्रे लिहिताना त्यातील भाषा म्हणूनच साधी, सोपी, सरळ असावी. जास्त पाल्हाळ न लावता आपले म्हणणे योग्य त्या शब्दात सांगणारी असावी. जेवढ्यास तेवढी भाषा असली तरी नम्र व संयत असावी.
औपचारिक पत्रांची मांडणी (Martahi Formal Letter Writing Format)
- पत्राच्या सुरुवातीला उजव्या कोपऱ्यात पत्र लिहिणाऱ्याचे नाव, हुद्दा (पत्र कोणत्या नात्याने लिहीत आहोत त्याचा उल्लेख, उदा.- विद्यार्थिप्रमुख, सजग नागरिक इ.) व पत्ता असावा.
- पत्त्यानंतर योग्य तो दिनांक, ई-पत्ताही लिहावा.
- त्यानंतर डावीकडे योग्य तो मायना असावा. संबंधित व्यक्तीचे नाव, हुद्दा व थोडक्यात पत्ता असावा.
- विशेषनाम पत्रात असेल तरच ते लिहावे. अन्यथा प्रति प्रेषक या ठिकाणी अ ब क असाच उल्लेख करावा.
- विषय - औपचारिक पत्रात 'विषय' लिहिणे आवश्यक ठरते. 'विषया' वरून पत्राचा हेतू संबंधित त्रयस्थ व्यक्तीच्या पटकन लक्षात येतो. त्यामुळे विषय नेमका व थोडक्यात लिहावा.
- महोदय/ महोदया असे लिहून पत्रलेखनाला सुरुवात करावी.
- पाल्हाळिकपणा न करता तरीही सविस्तरपणे नेमक्या शब्दात विषयविस्तार करावा.
- २ ते ३ परिच्छेदात मुद्देसूद लेखन असावे.
- शेवटी आपला /ली कृपाभिलाषी/आज्ञार्थी यांपैकी योग्य ते संबोधन वापरून समारोप करावा.
अनौपचारिक पत्रे (Informal Letter Writing in Marathi)
अनौपचारिक पत्रे म्हणजे घरगुती, कौटुंबिक, मित्र-मैत्रिणींना लिहिलेली पत्रे. या पत्रातून आपण आपल्या भावभावना, ख्याली, खुशाली दुसऱ्यापर्यंत पोहोचवत असतो.
अनौपचारिक पत्र लिहिताना (Marathi Informal Letter Writing Format)
- अनौपचारिक पत्र लिहिण्याचे विशिष्ट असे नियम-संकेत नाहीत.
- उजवीकडच्या कोपऱ्यात दिनांक, वार, गावाचे नाव लिहावे
- मध्यभागी ॐ / श्री असेही लिहिण्याची प्रथा आहे.
- डावीकडे प्रिय/तीर्थरूप/आदरणीय इ. योग्य भावना लिहून पुढे व्यक्तीचे नाव लिहून पत्र लेखनाला सुरुवात करता येते.
- शेवटी व्यक्तीनुरूप नमस्कार, आशीर्वाद लिहून तुझा / तुझी / तुमचा इ. लिहून समारोप करावा.
- पत्रातील भाषा संवाद केल्यासारखी गप्पा मारल्यासारखी साधी-सोपी, मनमोकळी असावी. वर्णनात्मक, खेळकर, दिलखुलास, आपलेपणाची असावी.
Marathi Letter Writing Books PDF for 10th, 9th, 8th
Rising Sar Hindi & Marathi Letter
Writing PDF |
|
Book Name |
Rising Sar Marathi Letter Writing Book |
Author Name |
Sheth |
Publisher |
Sheth Publishing House |
Pages |
112 |
Price |
Rs.180/- |
Language |
Marathi & Hindi |
PDF Size |
4.25 Mb |
Buy Online |
Click Here |
Download PDF |
Click Here |
Topics Covered
- Patra Lekhan in Marathi 10th, 9th, 8th
- How to write a letter in Marathi