लोकसभा माहिती मराठी - Lok sabha Mahiti in Marathi
MPSC लोकसभा माहिती
- लोकसभा हे संसदेचे प्रथम व कनिष्ठ सभागृह आहे.
- या सभागृहात लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात म्हणून त्याला लोकसभा म्हणतात.
- रचना कलम ८१: लोकसभेची सदस्य संख्या कमाल 550 इतकी निश्चित करण्यात आले आहे. ऍग्रो इंडियन समाजाचे दोन प्रतिनिधी राष्ट्रपतींनी निवडल्यास सदस्यसंख्या कमाल 552 नक्की होऊ शकते.
- त्यामध्ये घटक राज्याचे 530 व केंद्रशासित प्रदेशाचे 20 सदस्य असतात.
- कलम 331: अंगलो इंडियन जमातीस पुरेसे प्रतिनिधित्व न मिळाल्यास राष्ट्रपती या जमातीतून दोन सदस्यांची नेमणूक करू शकतात.
- १९ व्या लोकसभेतील स्थिती:
- लोकसभेवर राज्यवार सदस्यांची संख्या: १) उत्तर प्रदेश (सर्वाधिक): ८० २) महाराष्ट्र: ४८ ३) पश्चीम बंगल: ४२ ४) बिहार: ४० ५) तमिळनाडू: ३९
लोकसभा सदस्य साठी पात्रता
- उमेदवार भारताचा नागरिक असावा.
- त्याचे वय किमान 25 वर्षे असाव.
- संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटीची त्याने पूर्तता करावी.
- राखीव क्षेत्रातील उमेदवार हा त्यात जाती-जमातीच्या असला पाहिजे.
- त्याचे नाव कोणत्याही संसदीय मतदारसंघात मतदार म्हणून नोंदविलेले असावे.
- आरक्षण: अनुसूचित जातीसाठी 84 व अनुसूचित जमातीसाठी 47 अशा एकूण 131 (18.48%) जागा राखीव.
लोकसभा निवडणूक पद्धती
- लोकसभेचे सदस्य 18 वर्षावरील प्राऊड मतदारांकडून प्रत्यक्षरीत्या निवडून दिले जातात.
- हे सदस्य एक सदस्यीय मतदार संघातून निवडले जातात.
- हे निवडणूक गुप्त मतदान पद्धती व साध्या बहुमताने होते.
लोकसभेचा कार्यकाल
- लोकसभेचा कार्यकाल सर्वसाधारण स्थितीत पाच वर्षे असते.
- आणीबाणी काळात संस्कृत कायदा करून हा कार्यकाल एका वेळी जास्तीत जास्त एक वर्षासाठी वाढू शकते.
- आणीबाणी संपल्यावर सहा महिन्याच्या आत पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतात.
सदस्यांचा राजीनामा
- लोकसभा सदस्य आपला राजीनामा स्वीकृती साठी लोकसभा अध्यक्ष कडे पाठवितो.
- लोकसभेच्या परवानगीशिवाय सतत व सलग ६० दिवस लोकसभेच्या बैठकीस अनुपस्थित राहणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्व आपोआप रद्द होते.
- पक्षांतर केल्यास सदस्याचे सदस्यत्व रद्द होऊ शकते.
लोकसभेचे अधिवेशन
- संसदेच्या प्रत्येक सभागृहाची बैठक बोलविण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत.
- दोन अधिवेशनामध्ये 180 दिवसांपेक्षा जास्त काळ असू नये असा संकेत आहे.
- लोकसभेच्या अधिवेशन सुरू होण्यासाठी एकूण सभासद संख्येच्या एकदशाश इतकी सदस्य संख्या ही गणसंख्या ठरवण्यात आले आहे.
- लोकसभेचे सभापती व उपसभापती:
- लोकसभेचे निवडून आलेले सदस्य आपल्या पैकी एका सदस्याची सभापती व एकाची उपसभापती म्हणून निवड करतात.
- सभापती व उपसभापती यांचा कार्यकाल लोकसभेच्या कारकाला इतकाच असतो.
- लोकसभेच्या सभापती आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असल्यास त्याला तो उपसभापती सादर करावा लागतो. सभापती आपला राजीनामा सभापती कडे सादर करतो.
सभापती ची कार्य आणि अधिकार:
- सभासदांना प्रश्न विचारण्यास परवानगी देणे अथवा नाकारणे.
- प्रवर समितीच्या अध्यक्षाची नियुक्ती करणे.
- अधिवेशनास आवश्यक गणसंख्या नसल्यास ते तहकूब करणे.
- सदस्यास मातृभाषेतून प्रश्न विचारण्यास परवानगी देणे.
- कोणतेही विधेयक मतास टाकाने त्यावर सदस्यांचे मत आजमावणे व निर्णय झाल्यास करणे.