Join us On Social Media

Join our Telegram Channel To Get Latest Notification!
Join our YouTube Channel To Get Latest Video Notification!
Follow Me On Facebook To Get Latest Notification!
Techy Pranav PKD ART

नियोजन आयोग


नियोजन आयोग



आर्थिक नियोजनाचा मार्ग स्वीकारत सर्वप्रथम रशियात १९२७ ला नियोजनास व नियोजन आयोग यांची सुरुवात झाली.रशियातील आर्थिक नियोजनाचे महत्त्व जाणून पंडित जवाहलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली १९३८ आली काँग्रेसच्या त्रिपुरा अधिवेशनात नियोजन समितीची स्थापना करण्यात आली.

१ एप्रिल १९५१ पासून भारतात आर्थिक नियोजनाची सुरुवात झाली. नियोजनाचे तत्व भारताने रशियाकडून स्वीकारली.भारताच्या नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधान असतात.राज्याचे नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष मुख्यमंत्री असतात. जिल्ह्याच्या नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष पालकमंत्री असतात.
आर्थिक नियोजनाचे प्रकार

  1. आदेशाद्वारे- साम्यवादी किंवा समाजवादी देशांमध्ये आढळते उदा. रशिया, चीन
  2. प्रलोभनाद्वारे :- लोकशाही राज्यपद्धतीत आढळते. उदा. - भारत
  3.  सूचक मिश्र अर्थव्यवस्था जाते. उदा- फ्रान्स.

आर्थिक नियोजनाची आवश्यकता:-

विकासाच्या संधीचे असमान वाटप उत्पन्नातील व संपत्तीतील विषमता व्यापार सक्रीय चढ-उतार आर्थिक अस्थिरता यासारखे अनेक तोच अनियोजित अर्थव्यवस्थेत आढळतात हे सर्व दोष दूर करण्यासाठी आर्थिक नियोजनाची गरज भासते.

आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे:-

  • समाजातील सर्व व्यक्तींना विकासाची समान संधी मिळवून देणे
  • वैयक्तिक आणि सामाजिक विकास घडवून आणणे.
  • शक्य तितक्या अल्पावधीत शक्य तितक्या जलद आर्थिक विकास घडवून आणणे हे आर्थिक नियोजनात अभिप्रेत आहे.

भारतातील स्वातंत्र्यपूर्व आर्थिक नियोजन:

१) १९३४:- एम. विश्वेश्वरय्या (म्हसूर संस्थानचे दिवाण) यांनी planned economy for India या ग्रंथात सर्वप्रथम भारतासाठी नियोजनाची संकल्पना मांडली. त्यांनी १० वर्षांची योजना तयार केली.
२) १९३६ :- त्यांनी नियोजन करा किंवा नष्ट व्हावा असा संदेश दिला. Plan for Perish.
३) १९३८ :- काँग्रेसच्या त्रिपुरा अधिवेशनात (अध्यक्ष- सुभाष चंद्र बोस) पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली.
४) जानेवारी १९४४ - मुंबईतील ८ उद्योगपतींनी (जे.आर.डी. टाटा पुरुषोत्तम ठाकुरदास इ.) भांडवल वादाच्या आधारावर 'मुंबई योजना' तयार केली तिला टाटा बिर्ला योजना असेही म्हणतात.
५) १९४४ - श्री. श्रीमान नारायण अग्रवाल यांनी गांधीजींच्या आर्थिक विचारावर आधारित गांधी योजना तयार केली.
६) एप्रिल १९४५ - मुंबई योजनेला उत्तर म्हणून मानवेंद्रनाथ रॉय यांनी 'जनता योजना' तयार केली.
७) जानेवारी १९५० - जयप्रकाश नारायण यांनी 'सर्वोदय योजना' तयार केली.
८) जानेवारी १९५० - "कोलंबो योजना"

महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाची स्थापना १९७२ मध्ये करण्यात आली.

राष्ट्रीय योजना आयोग/नियोजन मंडळ:-

१) स्थापना :- १५ मार्च १९५०
२) स्वरूप :- असंविधानिक, घटनाबाह्य, अवैधानिक कायदे बाह्य
 मंडळ-नियोजन मंडळ केंद्र सरकारला नियोजनाच्या बाबतीत सल्लागार मंडळ म्हणून कार्य करत
३) अध्यक्ष:- पंतप्रधान- पदसिद्ध
४)  सहभाग:-अध्यक्ष, उपाध्यक्ष, काही कॅबिनेट मंत्री, नियोजन मंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, अर्थतज्ञ, विचारवंत.
५) कार्य :- नैसर्गिक, तांत्रिक व मानवी संसाधनाचा शोध घेणे. पंचवार्षिक योजना तयार करणे.
नियोजनाचे विविध टप्पे ठरवणे.
देशाच्या आर्थिक प्रगतीच्या मार्गातील अडथळे सरकारला सत्तेत करणे.
योजनेचे वेळोवेळी परीक्षण करून त्यात योग्य ते बदल सुचविणे.

  • भारतात १ एप्रिल १९५१ पासून झालेले आर्थिक नियोजन १९८५ पर्यंत पूर्णपणे आदेशात्मक planning by direction होते.
  • पहिल्यांदा सर्वप्रथम सातव्या योजनेत अंशता विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सुचक नियोजन प्रणाली indicator planning चा अवलंब करण्यात आला.
  • ८ व्या योजनेला भारताची पहिली पूर्ण सूचक नियोजनाची योजना मानले जाते.
  • २ ऱ्या योजनेपासून भारताने समाजवादी समाजरचनेचे तत्त्व स्वीकारले.