-->

Get Job Alert On Telegram

Join our Telegram Channel To Get Latest Notification!
Join our YouTube Channel To Get Latest Video Notification!

Welcome to MahaGovJobs

[100+] मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ - Vakprachar In Marathi with Meaning PDF Download

Marathi Vakprachar with Meaning PDF

मराठी वाक्यप्रचार, अर्थ आणि वाक्यात उपयोग

Vakprachar in Marathi:- नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणातील वाक्यप्रचार या घटकाबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. भाषेत असे काही शब्द वा शब्दसमूह येतात की त्यांचा शब्दशः अर्थ घेऊन चालत नाही. रोडी ने किंवा परंपरेने त्यांना मूळ अर्थापेक्षा वेगळाच अर्थ प्राप्त झालेला असतो व तोच भाषेत रूढ होऊन बसतो. अशारीतीने शब्दशः होणाऱ्या अर्थ पेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्द समूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. नमुन्यादाखल काही वाक्यप्रचार त्यांना प्राप्त झालेल्या अर्थासह पुढे दिले आहेत.

मराठी वाक्यप्रचार व त्यांचा अर्थ

 • सर्वस्व पणाला लावणे:- सर्व शक्य मार्गाचा अवलंब करणे
 • साखर पेरणे:- गोड गोड बोलून आपलेसे करणे.
 • सामोरे जाणे:- निधड्या छातीने संकटास तोंड देणे
 • अक्षर मुळे:- लिहिता वाचता येणे
 • साक्षात्कार होणे:- आत्मिक ज्ञान प्राप्त होणे खरेखुरे स्वरूप कळणे
 • सुताने स्वर्गाला जाणे:- थोडा सुगावा लागताच संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाण्याचा प्रयत्न करणे.
 • सूतोवाच करणे:- पुढे घडणाऱ्या गोष्टी ची प्रस्तावना करणे
 • सोन्याचे दिवस येणे:- अतिशय चांगला दिवस येणे
 • संधान बांधणे:- जवळीक निर्माण करणे
 • संभ्रमात पडणे:- गोंधळात पडणे
 • स्वप्न भंगले:- मनातील विचार कृतीत न येणे
 • स्वर्ग दोन बोटे उरणे:-आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे
 • हट्टाला पेटणे:- मुळीच हट्ट न सोडणे
 • हमरीतुमरीवर येणे:- जोराने भांडू लागणे
 • हरभऱ्याच्या झाडावर चढवणे:- खोटी स्तुती करून मोठेपणा देणे
 • हसता हसता पुरेवाट होणे:- अनावर हसू येणे
 • हस्तगत करणे:- ताब्यात घेणे

Marathi Vakprachar PDF Download