क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? Cryptocurrency meaning in Marathi
Bitcoin Information in Marathi
झपाट्याने बदलणाऱ्या या युगात अर्थव्यवस्थासुद्धा आपले अंतरंग बदलत आहेत. चलन हे अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कालनुरूप चलनव्यवस्थेनेदेखील आपली रूपे बदलली आहेत. पारंपरिक अर्थव्यवस्थेत भौतिक स्वरूपात असणारे चलने कॉम्प्युटर व इंटरनेटच्या जमान्यात अभासी (Virtual) बनली आहेत. हाताने स्पर्श करू शकणाऱ्या नाणी व कागदी चलनांनी शून्य व एक अशा अंकाच्या गणिती सूत्राचे अंकिय रूप घेतले आहे. या अंकिय चलनास (Digital Currency) क्रिप्टोकरन्सी म्हणूनदेखील संबोधण्यात येते. ही चलन व्यवस्था जितकी सोपी तितकीच क्लिष्ट आहे. अभासी चलनांना समजून घेण्यासाठी पैशाचा इतिहास व चलनांची उत्पत्तीपासून बदल आपणास समजून घ्यावे लागतील.
मानवाने जेव्हा आपल्या गरजेपेक्षा जास्त उत्पादन निर्माण करण्यास सुरुवात केली, त्या वेळी व्यापारास सुरुवात झाली. वस्तू व सेवांचा मोबदला म्हणून जी बाब वापरली जाते त्यास पैसा (Money) असे म्हटले जाते. व्यापाराची सुरुवात ही पैशाच्या उत्पत्तीचे कारण ठरली. सुरुवातीच्या काळात एका वस्तू किंवा सेवाचा मोबदला म्हणून दुसरी वस्तू किंवा सेवाच दिली जात होती. या वस्तू विनिमियास इंग्रजीमध्ये 'बार्टर' पद्धती म्हणतात; पण या पद्धतीच्या खूप मर्यादा आहेत. कमी प्रमाणात विनिमय उपयोगी आहे. व्यापार वाढला तर ही पद्धत निकामी बनते यासाठी एक सर्वमान्य मध्यस्थ चलन व्यापार असताना वस्तू स्वीकारणे ही गरज बनते. यातूनच चलन व्यवस्थेची सुरुवात झाली.
चलन व्यवस्थेच्या सुरुवातीस लगेच धातूची चलने आली नाहीत तर प्रथम एकाच वस्तूने एखाद्या संपूर्ण प्रदेशात चलनाची भूमिका बजावली. या वस्तू बहुदा धान्य होत्या. उदा. गहू, तांदूळ इ. कालांतराने याऐवजी धातू वापरण्यात सुरुवातझाली. उदा. ताब्याची नाणी, सोन्याची नाणी, भारतात बुद्धयुगात तांब्याची नाणी, गुप्तकाळात प्रामुख्याने सुवर्णनाणी तर मध्ययुगात चांदीची नाणी वापरली गेली. आधुनिक काळात कागदी चलनांचा वापर सुरू झाला.
आधुनिक काळ हा राजकीयदृष्ट्या स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्राचा काळ आहे. हे देश आपल्या भौगोलिक क्षेत्रासाठी एका वेगळ्या चलन व्यवस्थेची निर्मिती करतात. या व्यवस्थेत कागदी चलनांबरोबरच, नाण्यांनीदेखील आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. ही चलने शासनांची मान्यता असणारी आहेत. या चलनांचे व्यवस्थापन शासन स्वत: किंवा मध्यवर्ती बँक करते. चलन निर्मितीस कायद्याचे पाठबळ पाहावयास मिळते. उदा. भारतात कागदी चलन कायदा, 1861नुसार भारतात या पद्धतीची सुरुवात झाली. भारतात प्रथम याचे अधिकार शासनाकडे होते; पण 1935 साली आर.बी.आय.ची स्थापना झाली व हे अधिकार तिच्याकडे सुपूर्त करण्यात आले ते आजतागायत हे अधिकार RBI कडेच आहेत. फक्त नाणी व एक रुपयाची नोट यांचे अधिकार शासनाकडेच आहेत.
प्रत्येक
देश चलननिर्मिती सुरक्षित असावी याची खबरदारी घेते.
त्या चलनाची विश्वासहार्यता टिकून राहावी म्हणून प्रयत्न करते. यासाठी चलन निर्मितीवेळीच मालमत्ते
आधारे चलन निर्माण केले
जाते. 1956पूर्वी भारतात अशा प्रकारची मालमत्ता
म्हणून जितके नवीन चलन छापले
जाते त्या प्रमाणात सोने
आरबीआय आपल्याकडे राखून ठेवत. सध्या भारतात
चलन छपाईसाठी 'किमान राखीव निधी' तत्त्व वापरले जाते. यानुसार भारतात RBI आपल्याकडे 200 कोटी स्वरूपात 85 कोटी परकीय स्वरूपात) किमान निधी म्हणून राखून ठेवते व या आधारे गरजेचे नवीन चलन छापले जाते.यामुळे ज्या वेळी चलनातील लोकांचा विश्वास निघून गेला बाजारात जर चलन स्वीकारले मन झाले रे आरबीआयला परत केले जाईल व या मोबदल्यात वस्तूंची अपेक्षा RBIकडून केली जाईल. RBI राखीव निधी आधारे त्या वस्तू बाजारातून (दशी किंवा वेळी चलनातील लोकांचा विश्वास निघून गेला, बाजारात जर चलन स्वीकारणे बंद झाले तर हे RBIला परत केले विदेशी) घेऊन उपलब्ध करून देईल यामुळे चलनातील विश्वास पुन्हा निर्माण होईल.
यामुळे ज्याभारतीय चलन व RBI बाबतीतील ही गोष्ट थोड्याफार फरकाने सर्व चलनांना लागू होते. सुरक्षिततेसाठी मालमत्तेचे स्वरूप व प्रमाण बदलेल, पण मालमत्तेच्या आधाराची गरज सर्व अर्थव्यवस्थेनी ओळखून हे तत्त्व लागू कलेच आहे. •मागील काही दशकांपासून अर्थव्यवस्थेत नवीन प्रवाह आले यामध्ये जागतिकीकरण तसेच बहराष्ट्रीय कंपन्यांचा वाढता
प्रभाव, माहिती व प्रसार संगणकाचा वापर, अंकिय (Digital) क्रांती यांचा उल्लेख करता येईल. आर्थिक व्यवहारांचा वेग वाढला व अंतर कमी होत गेले. यातून कमी वेळात व कमी मोबदल्यात व्यवहार होणे गरज बनली. संगणकाच्या वापरातून होणाऱ्या डिजिटल व्यवहारांनी वेळ कमी केला; पण या व्यवहारात चलन म्हणून भौतिक चलनांची पारंपरिक व्यवस्था काम करत होती. व्यवहारात बँका, चलनाचे इतर देशांच्या चलनातील विनिमय त्याचा विनिमय दर मध्यस्थांचे मोबदले यामुळे अजून हे व्यवहार म्हणजे e-commerce महागच ठरत होते. यातून अभासी चलनाची निर्मिती झाली. यालाच क्रिप्टोकरन्सी तसेच अंकिय (Digital) चलन असेदेखील संबोधले जाते. याना अभासी म्हणतात कारण पारंपरिक नाणे-कागदी चनाप्रमाणे या चलनांना आपण पाहू किंवा स्पर्श करू शकत नाही.अभासी चलन प्रथम इलेक्ट्रॉनिक पैसे, अंकिय पैसे म्हणून अस्तित्वात आले; पण आपण या चलनांना अर्थरूपी। अभासी चलन म्हणू शकतो. 2009मध्ये संतोशी नाकामाटोया व्यक्तीने 'बिटकॉईन' नावाने आभासी चलन निर्माण केले. हे खऱ्या अर्थाने अभासी चलनाचे पहिले रूप होय. आपणास अभासी चलनाची जी वैशिष्ट्ये समजून घ्यायची आहेत ती आपण या 'बिटकॉईन'च्या माध्यमातून समजून घेऊ.
काही व्यक्तींचा समूह संगणक व इंटरनेट आधारे होणाऱ्या आपल्या व्यवहारांसाठी परस्पर संमतीने स्वीकारणाऱ्या डिजिटल चलनास अभासी चलन म्हणतात. संतोशी नाकामाटोनी तयार केलेल्या चलनास बीटकॉइन नाव दिले. ज्या वेळीस बीटकॉइन्स इंटरनेट आधारे एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पाठवले जाते तेव्हा ते एका डिजिटल पाकिटातून (Wallet) मधून दुसऱ्याच्या मालकीच्या वॅलेटमध्ये जाते. ही देवाण घेवाण कोणत्याही मध्यस्थाविना होते. जर हे आपण पैशाच्या आधारे केले तर तेथे बँका मध्यस्थ म्हणून येतात व या मध्यस्थांना मोबदला द्यावा लागतो. तो न परवडणारा असतो. बिटकॉइन जर पाठवले तर मध्यस्थ नसल्याने खूप स्वस्तात व्यवहार होतात. या प्रकार दोन व्यक्तीतील मध्यस्थाविना पाठवणुकीस 'पिअर टू पिअर' (Peer to peer) म्हणतात.
बिटकॉइन म्हणजे काय? What is Bitcoin in Marathi?
बिटकॉइनसारख्या अभासी चलनाची पाठवणूक तसेच निर्मिती ही एक गणित सोडवण्यातून होते. (Mathematical problem) सुरक्षितरीत्या पाठवणुकीत गणित सोडवण्याच्या प्रक्रियेस खणने (minning) असे म्हणतात. हे करणारे तज्ञ माइनर म्हणून ओळखले जातात. या माइनर ना मिळणारा मोबदला देखील बिटकॉइन स्वरुपातच मिळतो. बिटकॉइन जे वॅलेटमध्ये जमा होतात ते एक प्रकारचे डिजिटल कोड असतात.
वॅलेट तुम्ही कोणत्याही डिजिटल पर आथोरै उदा. कॉम्प्युटर, मोबाईल हाताळू शकता, वॅलेट उघडण्यासाठी. 2 चाचण्या असतात. एक पब्लिक व एक प्रायव्हेट (वैयक्तिक) असते. यामुळे वॅलेट खूपच सुरक्षित राहते. वॅलेटला कोणत्याही व्यक्तीच्या नावाची जोड नसते. वॅलेटस् अनामिक असतात. यामुळे वॅलेटच्या मालकाची ओळख गुप्त राहते याला बॅलेटची अनॉनमिटी म्हणतात.
बँकिंग प्रणालीमध्ये आपण जे व्यवहार करतो याचा लेखाजोखा पासबुकमध्ये नोंद असतो. याचसारखे तुमचे अभासी चलनाचे पासबुक म्हणजे लेजर होय. यामध्ये किती, कोठून कधी चलन मिळाले वा दिले याच्या नोंदी असतात या नोंदी शृंखला (Chain) स्वरूपात असतात. एक व्यवहार झाला तर त्याचा ब्लॉक तयार होतो व तो पूर्वीच्या व्यवहाराशी जोडून शृंखला तयार होते तो म्हणजे ब्लॉक चेन. थोडक्यात व्यवहाराच्या सुव्यवस्थित व सुरक्षित नोदी करण्याचे तंत्रज्ञान म्हणजे ब्लॉक येन तंत्रज्ञान हे कोणत्याही ठिकाणी वापरले जाऊ शकते. त्याचा अभासी चलनासाठी वापर झाला आहे. अभासी चलनाचे हे रेकॉर्ड क्रिप्टोग्राफी तंत्राने सुरक्षित बनवतात. ही सुरक्षा अभेद्य आहे असे मानतात. शृंखलेत जोडल्या गेलेल्या सर्व वॅलेटधारकांना ही ब्लॉक चेन खुली असते म्हणून ही प्रक्रिया पारदर्शक आहे असे म्हणतात. यामुळे जर एखाद्या वॅलेटमध्ये जर काही घोटाळा झाला तर तो इतर ठिकाणी पडताळला जाऊ शकतो व तो पकडला जातो. झालेले व्यवहार हे अपरिवर्तनीय असतात ते रद्द करता येत नाहीत. एका व्यवहाराने एक ब्लॉक तयार होतो. हा ब्लॉक तयार झाला तर काही अभासी चलनांची निर्मिती होते. प्रत्येक चार वर्षांनी एका ब्लॉकमुळे तयार होणाऱ्या अभासी चलनांची संख्या आर्धी होते. साधारण 125 वर्षांनी त्या प्रकारच्या नविन अभासी चलनांची संख्या अर्धी होते. साधारण 125 वर्षांनी त्या प्रकारच्या नवीन अभासी चलन निर्मिती बंद होते. जर मागणी श्री वाढत गेली व निर्मिती घटत गेली तर याचे बाजारमूल्य वाढत जाईल, असा अंदाज असतो, त्यामुळे व्यवहार साधनापेक्षा गुंतवणुकीचे माध्यम म्हणून अभासी चलनांना महत्त्व आले आहे. बिटकॉइनची किंमत 2009मध्ये 0.03 डॉलर प्रती बिटकॉइन होती ही 2016मध्ये 10,000 डॉलर झाली.
अभासी चलनांचा प्रथम उपयोग पैसे पाठवण्यासाठी झाला. भारतात बिटकॉइनसारख्या अभास चलनाचा जास्तीत जास्त वापर रेमीटन्स (पगारांचे मायदेशी पाठवणे) साठी झाला. अभासी चलनांचा वापर बहुआयामी बनत गेला. 2010 मध्ये बिटकॉइन या अभासी चलनाचा वापर वस्तू व सेवांच्या खरेदी विक्रीसाठी सुरू झाला. 22 मे 2010 पिझ्झा खरेदीसाठी म्हणजे एक वस्तू खरेदीसाठी झाला. मध्ये बिटकॉइनचा वापर
अभासाची चलनाचे सर्व व्यवहार पारदर्शक व सर्वश्रुत राहत असल्यामुळे काळ्याधनाची कोणतीही शक्यता या अभासी चलन जगतात नाही. भौतिक पैसा व बँकिंग प्रणालीमुळे पत निर्मिती केली जाते. यामुळे अर्थव्यवस्थेत चलन संकोच, फुगवटा सारखी दोलने दिसून येतात. डिजिटल चलनामध्ये ही शक्यता सध्यातरी दिसत नाही.
बिटकॉइन व्यवहारात आल्यानंतर अभासी चलनाच्या अनेक मर्यादा समोर आल्या. अभासी चलन सुरक्षित आहेत ही त्याची सर्वांत जमेची बाजू समजली जात होती; पण 2014 मध्ये जपानच्या काही हॅकर्सनी वॅलेटमधून बिटकॉइन गायब केले, त्यामुळे अभासी चलनांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
एखाद्या बिटकॉइनधारकाने आपल्या वॅलेटच्या चाव्या (Key) जर आपल्या कायदेशीर वारसदारास न सांगता जर त् मृत्यू झाला तर वारसदार कायदेशीर असून त्याला या वॅलेटचा ताबा मिळणार नाही. काही तांत्रिक बिघाडामुळे किंवा वापरातील गलथानपणामळे जर वॅलेट डिलीट झाले तर बिटकॉइन कायमच्या नष्ट होतात.
वॅलेट अनामिक असल्याने याचा मोठ्या प्रमाणात वापर बेकायदेशीर व्यवहार करण्यासाठी होऊ शकतो. ड्रग माफिया, खंडणी, हवाला यांसारख्या व्यवहारासाठी यांचा वापर होऊ शकतो. भारतात ड्रग माफियांनी बिटकॉइनचा वापर केलेले तपासात आढळल्याने पोलिसांनी 500 बिटकॉइन्सचे वॅलेट बंद केले. युरोपीय देशात बिटकॉइन्सचा वापर वाढण्याच्या प्रमुख कारणामध्ये खंडणी देण्यासाठी मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना हे अभासी चलन सोईचे आहे हे आहे.
अभासी चलने मृतवत (dying currency) आहेत. काळानुसार यांची निर्मिती घटत जाते व ठरावीक काळानंतर ही विशिष्ट चलने बफेटसारखा इन्व्हेस्टमेंट गुरू यांचे भविष्य अंधकारमय आहे असे मत देतो तर बिल गेट्ससारखा संगणक क्षेत्रातील तज्ज्ञ अभासी चलनांना भविष्याचे चलन म्हणतो.
अभावी चलनांची प्राथमिक उपयुक्तता पैसे पाठवणुकीचे साधन ही होती. सध्या याकडे प्रामुख्याने गुंतवणुकीचे साधन म्हणून पाहिले जाते. बिटकॉइनसारख्या आभासी चलनाचा वापर यामुळे मोठ्या प्रमाणात सट्टेबाजीसाठी झाला. विकसित देशातील गुंतवणूकदारांनी प्रथम या चलनामध्ये गुंतवणूक केली. 2009 ते 2014 दरम्यान यांची प्रामुख्याने मालकी विकसित देशांकडे राहिली. यानंतर मोठ्या प्रमाणात जाहिराती, अभिनेत्याच्या आधारे दिलेली प्रसिद्धी व आकर्षक दिशाभूल करणारी आकडेवारीतून या चलनांना विकसनशील देशात प्रसिद्ध केले. यामुळे विकसनशील देशातील गुंतवणूकदार भविष्यातील अतुलनीय परताव्याला भुलला. 2016 पर्यंत नव्या गुंतवणूकदारांनी जुन्या गुंतवणूकदारांचा मोठा फायदा करून दिला. 2016 नंतर हा फुगा फुटला. बिटकॉइनची किंमत मोठ्या प्रमाणात घसरली. नवे गुंतवणूकदार वेठीस राहिले अशा प्रकारे आधुनिक सट्टेबाजीने संधी साधली.
कोणतेही चलन जेव्हा पैसा म्हणून वापरले तेव्हा त्याने अनेकविध कार्य करणे अपेक्षित असते. ते चलन वस्तू-सेवांची नर खरेदी करणे यासारखे प्राथमिक, देणी भागवणे यासारखी द्वितीय कार्य करतेच पण त्याचबरोबर पतनिर्मिती, चलनाची सर्वसमावेशकता ही असणे गरजेचे असते. खेळते चलन व पत याचे एकत्रित रूप म्हणजे चलन उपलब्धता असते. पतनिर्मिती झाली नाही तर गुंतवणुकीचे प्रमाण कमी व आर्थिक वाढीचा दर कमी राहतो. चलनाची उपलब्धता ही चलनाच्या गरजेइतकी असणे महत्त्वाचे असते. त्याचे प्रमाण कमी व जास्त असून चालत नाही. यामुळे किमती स्थिर राहतात. देशातील मौद्रिक धोरण गरजेनुसार चलन उपलब्धता ठेवण्याचे कार्य करते. अभासी चलन व्यवस्था ही पतनिर्मिती तर करू शकत नाही व निर्माण झालेले चलन नष्ट करता अथवा मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकत नाही, त्यामुळे या व्यवस्थेत मौद्रिक धोरण निकामी बनेल.
अभासी चलन व्यवस्था अनियंत्रित आहे. कोणत्याही अनियंत्रित व्यवस्थेत किमतीची मोठ्या प्रमाणात अस्थिरता असते व अशी व्यवस्था धोकादायक असते. अभासी चलन व्यवस्था ही 1991 च्या दरम्यान आग्नेय आशियाई देशांनी स्विकारलेल्या पेगींग (Pegging) प्रणाली प्रमाणे आहे. या प्रणालीत सर्वांत मोठी मर्यादा म्हणजे देशातील चलनाची किंमत विदेशी चलनाच्या किमतीशी बांधून ठेवणे. यामुळे आपली अर्थव्यवस्था दुसऱ्या देशाच्या ओलीस ठेवण्यासारखे आहे. हा नव-वसाहतवादाचाच भाग आहे. हे धोके वेळीच न ओळखता आल्याने आशियाई टायगर ठरलेल्या या अर्थव्यवस्था एकाच झटक्यात संपून गेल्या. अनियंत्रित प्रणालींचे हे धोके वेळीच ओळखण्याची ताकत देशाच्या अर्थनीती तज्ज्ञाकडे हवी. अथवा नुकसान अटळ आहे. चलन सर्वव्यापी असायला हवे म्हणजे ते सर्व प्रदेशात व समाजातील सर्व स्तरांतील व्यक्तींना सेवा देणारे हवे. भारतासारख्या विकसनशील देशात जेथे आर्थिक असमानता आहेच; पण ही चलने ही दरी अजून वाढवतील. ही चलने समाजातील बऱ्याच घटकांच्या वापरात येणार नाही म्हणजे या चलनात समानता नाही, लोकशाही तत्त्वांचा अभाव आहे. यामध्ये शासन व सर्व जनता या दोन्हींचा अभाव आहे. सद्या ही चलने हुकूमशाहीकडे झुकलेली दिसतात. यांचे लोकशाहीकरण (Democratisation) होणे गरजेचे आहे. लोकशाही नाकारण्याचा अट्टहास हुकूमशाही निर्मितीस वाव देतो.
अभासी चलनांच्या प्राथमिक मर्यादांवर मात करत अनेक नवीन अभासी चलने बिटकॉइन नंतरही निर्माण होत राहिली. यामध्ये प्रामुख्याने अल्टकॉईन, लिटेकॉईन, इथियरम, झेडकॅश, डॅश सारखी नावे घेता येतील. सध्या बाजारात साधारण तीन हजार अभासी चलने आहेत. काही चलने लप्त होतात काही नवीन तयार होतात. भारतातदेखील लक्ष्मी चलनाचा प्रयोग झाला.
फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकेनबर्ग याने 'लिब्रा' या अभासी चलनाची घोषणा केली. यात त्याने प्रमुख कंपन्यांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे चलनाची व्याप्ती वाढणार आहे. या चलनास वित्तीय मालमत्तेचा आधार देण्यात येणार आहे म्हणजे अभासी चलनाच्या मूळ संकल्पनेतील असुरक्षिततेचा धोका काढून टाकला आहे, त्यामुळे हे चलन काही प्रमाणात व काही काळासाठी यशस्वी ठरेल; पण अभासी चलन लोकाभिमुख व सर्वव्यापी बनले नाही.
सध्या अभासी चलन निर्मितीमध्ये फेसबुक व इतर मोठ्या कंपनीचा सहभाग भविष्यातील एकाधिकार प्रवृत्ती दर्शवते.
यावर उपाय म्हणून शासनाचा अभासी चलन निर्मितीमध्ये सहभाग असणे क्रमप्राप्त आहे. शासनाचा सहभाग संघिय पद्धतीने (Federal) करता येईल. या विकेंद्रित व्यवस्थेत प्रत्येक देशात तेथील सरकार एका अभासी चलनाची निर्मिती करेल. याची निर्मिती ते वित्तीय मालमत्तेच्या आधारावर करतील. याचा वापर सर्वांनी करावा यासाठी ते शासन प्रयत्न करेल. याचबरोबर जागतिक स्तरावर सर्व शासनांनी एकत्र येऊन एक अभासी चलन निर्माण करावे. यालादेखील मालमत्तेचा आधार द्यावा. जागतिक व देशातील अभासी चलने एकमेकात विनिमयक्षम बनवावीत. हा विनिमयदर खुल्या बाजाराप्रमाणे ठरावा.
लोकशाही अभासी चलनाची निर्मिती केंद्रीय (Unitary) पद्धतीनेसुद्धा करता येईल. जगातील सर्व शासने एकत्र येऊन एका 'अभासी चलन समिती'ची निर्मिती करतील. जे सर्व मान्य असेल. याला किमान राखीव मालमत्तेचा आधार देण्यात यावा. हे चलन सर्व देश वैधानिक चलन म्हणून स्वीकारतील.
अशा प्रकारे निर्माण झालेले लोकशाही अभासी चलन Democratic Virtual Currency हेच जगाचे भविष्य निर्माण करेल. यातून सुरक्षित पारदर्शी लोकशाही चलन व्यवस्था निर्माण होईल.