{PDF} भारतीय अर्थव्यवस्था मराठी 2024 - Bhartiya Arthvyavasha 2024 in Marathi PDF Download
भारतीय अर्थव्यवस्था 2024 मराठी PDF
अर्थव्यवस्था म्हणजे काय?
- अर्थव्यवस्था म्हणजे एकदा प्रदेश, राज्य किंवा देश यामध्ये अस्तित्वात असणाऱ्या उत्पादक उपक्रमांची गोळाबेरीज होय.
- अर्थव्यवस्थेच्या व्याख्या: अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे - ॲडम स्मिथ.
- संपत्ती साधनसामुग्री या बाबींचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करणारी व्यवस्था म्हणजे अर्थव्यवस्था होय.
- कुटुंबे व्यवसाय आणि शासन यांच्या उत्पन्न खर्च बचत व गुंतवणूक इत्यादींचे व्यवस्थापन करणारी व्यवस्था म्हणजे अर्थव्यवस्था.
- वेबस्टर शब्दकोष अनुसार: संपत्तीचे उत्पादन, वितरण व उपभोग यांचे नियमन करणारे व्यवस्था म्हणजे अर्थव्यवस्था.
- ऑक्सफर्ड शब्दकोश यानुसार: अर्थव्यवस्था म्हणजे विशिष्ट देश अथवा प्रदेशातील उत्पादन, व्यापार आणि पैशांचा पुरवठा यामधील परस्पर संबंध.
अर्थव्यवस्थेचे प्रकार
प्रामुख्याने अर्थव्यवस्थेचे तीन मुख्य प्रकार आहेत.
- भांडवलशाही अर्थव्यवस्था: या अर्थव्यवस्थेतील उत्पादन व साधने यांची मालकी व व्यवस्थापन यावर खाजगी व्यक्ती किंवा संस्था चे नियंत्रण असते. या व्यवस्थेतील उत्पादकांचा मुख्य उद्देश जास्तीत जास्त नफा मिळवणे हा असतो. उदाहरणार्थ: अमेरिका, जर्मनी, जपान यांची अर्थव्यवस्था.
- समाजवादी अर्थव्यवस्था: यामध्ये उत्पादन व साधनांची मालकी व्यवस्थापन यावर शासनाचे नियंत्रण असते. सामाजिक कल्याण साधने हा येथे प्रमुख उद्देश असतो. उदाहरणार्थ: चीन, रशिया यांची अर्थव्यवस्था.
- मिश्र अर्थव्यवस्था: या अर्थव्यवस्थेत खाजगी व सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रांचे सह अस्तित्व आढळते. त्यामध्ये नफा व समाजकल्याण यांचा समन्वय राखला जातो.उदाहरणार्थ: भारत, स्वीडन आणि UK यांची अर्थव्यवस्था.
भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व वैशिष्ट्ये
भारतीय अर्थव्यवस्था ह संमिश्र अर्थव्यवस्था आहे, संमिश्र अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था ज्यामध्ये खाजगी तसेच सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रातील उद्योगांचा समावेश होतो.
भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन अविकसित मात्र विकसनशील
या शब्दात केली जाते.
भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये
भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील.
- विशिष्ट भौगोलिक क्षेत्र: कोणत्याही अर्थव्यवस्थेचे निश्चित असे विशिष्ट भौगोलिक क्षेत्र असते. भारतीय शेत्रफळ सुमारे ३२,८७,२६३ चौकिमी असून जागतिक क्षेत्रफळ यामध्ये त्याचे प्रमाण 2.42 टक्के आहे.
- नैसर्गिक साधनसामग्रीची उपलब्धता: भूमी समुद्र जलाशय खनिजे जंगले प्रजन्य नैसर्गिक वायू वातावरण अशा नैसर्गिक साधनसामग्रीची विपुल उपलब्धता भारतीय अर्थव्यवस्थेत लाभली आहे.
- वाढती प्रचंड लोकसंख्या: चीन या देशात नंतर लोकसंख्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो, एकूण जागतिक लोकसंख्येच्या १७.५% लोकसंख्या भारतात एकवटली असून जगातील दर सहा व्यक्तीमागे एक भारतीय असे प्रमाण आढळते.
- दारिद्र रेषेखालील लोकांचे लक्षणे प्रमाण: २००९-१० मध्ये भारतात एकूण ४७.५ कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली होते, तर ५२.५ कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या बाहेर आले.
- राजकीय सार्वभौमत्व: भारत हे एक सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र असून येथील शासन जनतेच्या सामाजिक व आर्थिक कल्याणाची कटिबद्ध आहे.
- अर्थव्यवस्थेचे क्षेत्रीय विभाजन: भारतीय अर्थव्यवस्थेतील उत्पादक उपक्रमांचे खालील तीन गटात वर्गीकरण केले आहे. प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र,तृतीय क्षेत्र.