Join us On Social Media

Join our Telegram Channel To Get Latest Notification!
Join our YouTube Channel To Get Latest Video Notification!
Follow Me On Facebook To Get Latest Notification!
Techy Pranav PKD ART

वचन व त्यांचे प्रकार - वचन बदला - Vachan in Marathi - Vachan Badla in Marathi

वचन बदला शब्द

वचन म्हणजे काय?

  • वचन म्हणजे संख्या होय. नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्यासाठी जो धर्म असतो त्यास वचन असे म्हणतात.

वचनाचे प्रकार

  • एकवचन 
  • अनेकवचन
एकवचन: जेव्हा नामाच्या आरोपावरून एका वस्तूचा बोध होतो त्यास एकवचन म्हणतात.
  • उदाहरणार्थ: गाय, झाड, पुस्तक, परात इ.
अनेक वचन: जेव्हा नामाच्या रूपावरून अनेक वस्तूंचा बोलतो त्यास अनेकवचन असे म्हणतात.
  • उदाहरणार्थ: मुले, घरे, पुस्तके, पराती इ.

संस्कृत मध्ये तीन वचने असतात

  • एकवचन
  • द्विवचन
  • अनेकवचन

पुल्लिंग नामाच्या रूपा मध्ये होणारा बदल

नियम १) आ-कारान्तशिवाय इतर सर्व पुल्लिंग नामांची रूपे दोन्ही वचनात सारखेच असतात.

  • एकवचन: कवी दिवस टाहो फोटो लाडू तेली देव कागद फोनो नातू पक्षी गहू उंदीर शत्रू
  • अनेकवचन: कवी दिवस टाहो फोटो लाडू तेलि देव कागद फोनो नातू पक्षी गऊ उंदीर शत्रू

नियम २) आ-कारान्त पुल्लिंग नामाचे अनेकवचन ए-कारान्त होते.

  • एकवचन: काटा महिना कोल्हा रस्ता घोडा कुत्रा भाला रेडा रस्ता लांडगा ससा आंबा
  • अनेकवचन: काटे महिने कोल्हे रस्ते घोडे कुत्रे भाले रेडे रस्ते लांडगे ससे आंबे

वचना संबंधी विशेष गोष्टी (नियम)

  • नामाच्या तीन प्रकारांपैकी फक्त सामान्य नामा चेच अनेक वचन होते.
  • विशेष नामाचे व भाववाचक नामाचे अनेक वचन होत नाही. त्यांचे जर अनेक वचन केले तर ते सामान्य नाम होते.